कामशेत : विजेचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू | पुढारी

कामशेत : विजेचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू

कामशेत : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महामार्गालगत शेतात जनावरे चरत असताना विद्युत तारेचा शॉक लागल्याने म्हशीचा मृत्यू झाला.
यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. येवलेवाडी नायगाव येथील शेतकरी एकनाथ दत्तात्रय येवले याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल असताना त्यातच शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकनाथ येवले हे आपल्या जनावरांना महामार्गालतच्या शेतात घेवून गेले होते. या वेळी म्हैशीला विजेचा शॉक लागला. कामशेत महावितरणचे महाजन व कसबे या अधिकार्‍यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या वेळी शेतकरी एकनाथ येवले यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Back to top button