पुणे : कबुतरांच्या त्रासाची तक्रार केल्यामुळे खुनी हल्ला | पुढारी

पुणे : कबुतरांच्या त्रासाची तक्रार केल्यामुळे खुनी हल्ला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पाळीव कबुतरांच्या होणार्‍या त्रासामुळे पोलिसांकडे याची तक्रार केल्याच्या कारणातून कोयत्याने वार करून खुनी हल्ला करणार्‍या तिघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हल्ला करणार्‍या तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपेश चव्हाण (43, रा. घोरपडी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि एक संशयित आरोपी शेजारी-शेजारी राहतात. संशयित आरोपींकडे कबुतरे होती.

त्या कबुतरांच्या विष्टेचा आणि पंखाचा त्रास फिर्यादी यांना होत असल्याने त्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. मे महिन्यात मुंढवा पोलिसांनी संशयित आरोपींना याबाबत समज दिली होती. त्यानंतर आरोपीने त्याच्याजवळील कबुतरे सोडून दिली होती. याच वादातून साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर त्यांनी कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांनी सांगितले. हा प्रकार गुरुवारी (दि.28) रात्री आठ वाजता न्यू स्वागत चिकन अ‍ॅण्ड फिश दुकानासमोर घोरपडी
गाव येथे

Back to top button