ट्रेकरचा रायरेश्वरगडावर हृदयविकाराने मृत्यू

ट्रेकरचा रायरेश्वरगडावर हृदयविकाराने मृत्यू

भोर; पुढारी वृत्तसेवा: बारामतीच्या महाविद्यालयीन ट्रेकर युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रायरेश्वर गडावर ट्रेकिंगला जाताना शुक्रवारी (दि. 29) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. बारामतीतील शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वीचा विद्यार्थी शुभम प्रदीप चोपडे (वय 17) या विद्यार्थ्याचा भोरच्या रायरेश्वर गडाच्या पायथ्याशी झांबुळवाडी -कोर्ले येथून चालत ट्रेकिंग करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

बारामतीहून भोर येथील रायरेश्वर किल्ल्यावर विद्यालयातील 46 विद्यार्थी व शिक्षक ट्रेकिंगसाठी जात असताना शुक्रवारी (दि. 29) सकाळी साडेनऊच्या सुमारास शुभम चोपडे मित्रांबरोबर ट्रेकिंगला असताना हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. शुभम यास जवळच असणार्‍या प्राथमिक केंद्र आंबवडेला उपचारासाठी आणले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news