पुणे : नॅकच्या धर्तीवर शाळांचे मूल्यांकन; राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात शिफारस

पुणे : नॅकच्या धर्तीवर शाळांचे मूल्यांकन; राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात शिफारस
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सीबीएसई, आयबी बोर्ड, खासगी शाळा त्याचबरोबर विद्यापीठे, महाविद्यालयांचे मूल्यांकन करणार्‍या नॅकच्या धर्तीवर शाळांचे मूल्यांकन होणार आहे. या सर्वांचा अभ्यास करून एक सर्वंकष अहवाल तयार करण्यात आला आहे. हा सर्वसमावेशक मूल्यांकन प्रारूपची अंमलबजावणी करण्याची शिफारस नियुक्त करण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात केली आहे. शाळांचे मूल्यांकन आणि त्यांची गुणवत्ता व दर्जा निश्चित करण्यासाठी शाळेच्या वर्गखोल्यांसह, शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध साधनसामग्री, विविध मूल्यांकन मॉडेल्समधील मुद्दे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आदी विविध मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

या सर्व घटकांच्या मूल्यांकनासाठी प्रत्येकी दहा गुण दिले जावेत आणि गुणांच्या आधारे गुणानुक्रमे शाळांची वर्गवारी निश्चित करावी, अशीही शिफारस या अभ्यासगटाने केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळांचा दर्जा ठरविण्यासाठी निश्चित केलेल्या सर्व मुद्यांचे मुद्दानिहाय मूल्यांकन करण्यासाठी सापेक्ष प्रतवारी प्रणाली (रिलेटिव्ह ग्रेडिंग सिस्टम) विकसित करावी, या प्रणालीच्या माध्यमातून मुद्दानिहाय प्रत्येकी दहा गुणांपैकी उपलब्ध गुण निश्चित केले जावेत आणि या गुणांच्या सरासरीच्या माध्यमातून शाळांचे सर्वसमावेशक मूल्यांकन केले जावे. जेणेकरून मूल्यांकन पद्धती सीजीपीए म्हणजेच कम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट व्हरेज (सरासरी ग्रेड पॉइंट) अशी ठरू शकेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news