पिंपरी : दुचाकी न दिल्याने तरुणावर खुनी हल्ला | पुढारी

पिंपरी : दुचाकी न दिल्याने तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी : दुचाकी न दिल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. तसेच, कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री एकच्या सुमारास वाल्मिकी चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी हरीश अरुण गुरखा (25, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरज जयस्वाल (30, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीकडे त्यांच्या दुचाकीची चावी मागितली. मात्र, त्यावेळी त्यांनी चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली.

Back to top button