प्लास्टिक कोटिंगच्या वस्तू गायब; बंदीच्या निर्णयानंतर बाजारातील चित्र

प्लास्टिक कोटिंगच्या वस्तू गायब; बंदीच्या निर्णयानंतर बाजारातील चित्र

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील बाजारपेठेतून प्लास्टिक कोटिंगच्या सर्व वस्तू अचानक गायब झाल्या असून, बहुतांश दुकानांत पेपर डिश, पेपर ग्लास, पर्यावरणपूरकच वस्तू दिसत आहेत. सध्या राज्य सरकारने प्लास्टिक कोटिंग आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होईल, असे चित्र आहे. एकाएकी घेतलेल्या या निर्णयाने ग्राहकांवर काय परिणाम होतील, तसेच दुकानांतील चित्र कसे आहे, याची पाहणी दै. 'पुढारी'ने रविवार पेठेतील बोहरी आळीत जाऊन केली. तेथे वेगळेच चित्र दिसले.

प्रत्यक्ष दुकानदाराशी झालेला संवाद पुढीलप्रमाणे….

प्रतिनिधी : प्लास्टिक कोटिंगचा ग्लास आहे का?
विक्रेते : आमच्याकडे प्लास्टिकचे ग्लास मिळत नाहीत.
प्रतिनिधी : प्लास्टिकची डिश मिळते का?
विक्रेते : तेही आमच्याकडे मिळत नाही.
प्रतिनिधी : मग त्याला पर्याय काय?
विक्रेते : आमच्याकडे पेपर डिश, पेपर ग्लास अन् कप आहेत. हे पर्यावरणपूरक आहेत, तेच आम्ही विकतो.
सध्या बाजारात पर्यावरणपूरक डिस्पोजेबल पेपर डिश, पेपर ग्लास, कप, कंटेनर मिळत असल्याचे चौकशीनंतर समजले.

प्लास्टिकच्या उत्पादनांची छुपी विक्री
नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका विक्रेत्याने सांगितले की, काहीजण छुप्या रीतीने प्लास्टिकची उत्पादने विकत आहेत. काही ठिकाणी प्लास्टिकचे ग्लासही मिळतात, तर काही ठिकाणी डिशही विकल्या जात आहेत.

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकवर बंदी असल्याने आम्ही पर्यावरणपूरक पेपर डिश, ग्लास, कप विकतो. मार्केट यार्ड, नसरापूर येथून हा माल आणला जातो. बरेचसे विक्रेते प्लास्टिकची उत्पादने विकत नाहीत. कारण, त्यावर कारवाई होते आणि दंड आकारला जातो. म्हणूनच प्लास्टिकची उत्पादने आम्ही विकत नाही.

                                                                           – बबन फासे, विक्रेते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news