पुणे : 284 ग्रामपंचायतींची उद्या आरक्षण सोडत | पुढारी

पुणे : 284 ग्रामपंचायतींची उद्या आरक्षण सोडत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण (ओबीसी) पुन्हा लागू झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 284 ग्रामपंचायतींचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 29) आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यात स्थापित झालेल्या, 2021 आणि 2022 मध्ये मुदत संपणार्‍या 284 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबल्या आहेत.

आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल केले. त्यानुसार आता निवडणुका होणार आहेत. प्रशासनाकडून निवडणुकांची तयारी केली जात आहे. जिल्ह्यात नव्याने स्थापित झालेल्या, 2021 आणि 2022 मध्ये 303 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यातील 19 ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ही निवडणूक विना आरक्षण होत आहे, तर 284 ग्रामपंचायतींची निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार आहे.

Back to top button