पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरात कचर्‍याची दुर्गंधी | पुढारी

पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरात कचर्‍याची दुर्गंधी

पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरात कचर्‍याचे ढीग साचलेले असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात स्वच्छता मोहिम रावविली जात आहे; मात्र असे असूनही अजूनही काही नागरिक याकडे दुर्लक्ष करून कचरा कोठेही टाकत आहेत. स्वच्छता मोहिम राबविताना आरोग्य विभागाकडून कचर्‍याचे विलगीकरण करण्याबाबतही नागरिकांना आवाहन केले जात आहे.

स्वच्छाग्रहच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मोरया पार्क भागात मोठ्या प्रमाणात सोसायट्या आहेत. या परिसरातीळ मोकळ्य जागेत स्थानिक नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाच्या पाण्यामुळे साचलेला कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कचर्‍याच्या परिसरात भटकी कुत्री, डुकरांचा वावर देखील वाढला आहे. त्यामुळे या परिसरातील कचरा वेळोवेळी उचलणे गरजेचे आहे. पावसाळा असल्याने कचरा कुजून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यू, मलेरिया, हिवतापसदृश आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घंटागाडीत कचरा टाकला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

पिंपळे गुरव परिसरात कचर्‍याचे ढीच साचलेले असतात. याकडे महापलिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील कचरा वेळेवर उचलणे गरजेचे आहे.
-सुरेश सकट, स्थानिक रहिवासी

या भागात घंटा गाडी जाते; परंतु नागरिक बेपर्वापणाने कचरा रस्त्यावर टाकतात. या परिसरारत बहुतांश सोसायट्या असल्याने नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत टाकणे गरजेचे आहे. नागरिकांनी परिसरातील मोकळ्या जागेत कचरा टाकू नये, कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. भागातील ग्रीन मार्शल नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून संबंधितांवर कारवाई केली जात आहे; तसेच ज्या ठिकाणी कचरा साचला आहे. त्या परिसरातील कचरा उचलून साफसफाई केली जात आहे; तसेच औषध फवारणी देखील केली जात आहे.
-भीमराव कांबळे, आरोग्य निरीक्षक, पिंपळे गुरव

Back to top button