पुणे : शाळकरी मुलीचा पाठलाग; काकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी | पुढारी

पुणे : शाळकरी मुलीचा पाठलाग; काकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शाळकरी मुलीचा पाठलाग करून छेड काढणार्‍या रोडरोमियोंनी काकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पाटेकर, तुषार येनपूरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेची 13 वर्षांच्या मुलीचा आरोपी पाठलाग करून तिची छेड काढत होते. मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीच्या काकांनी कात्रज परिसरातील दत्तनगर भागात आरोपी पाटेकर, येनपुरे यांना अडवले. मुलीची छेड का काढता. तिला त्रास देऊ नका, असे त्यांनी आरोपींना सांगितले. त्यावेळी आरोपींनी काकाला शिवीगाळ केली. मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक रसाळ तपास करत आहेत.

Back to top button