

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या शालेय वाहतुकीच्या वाहनाने मोटार वाहन कायद्याची योग्य अंमलबजावणी केली आहे की नाही, याची आरटीओकडून दिवे घाटात बस पासिंगसाठी आल्यावर प्राधान्याने तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे या गाड्या तपासणीसाठी लवकरात लवकर दिवे घाटात हजर कराव्यात, असे पीएमपी प्रशासनाला सांगितले जाणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. गेले 37 वर्षे पीएमपी प्रशासन बेकायदा शालेय वाहतूक करत होते. याकडे सर्व प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत होते. त्या संदर्भात विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेत गेले तीन-चार दिवस दै.'पुढारी'त सलग वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.
त्याची गंभीर दखल परिवहन आयुक्तांनी घेतली व पीएमपीवर तत्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार आरटीओ आता पीएमपीला शालेय वाहतुकीच्या 56 गाड्या पासिंग करण्यासाठीचे पत्र दिले जाईल. याबाबत पीएमपीचे अधिकारी सुबोध मेडशीकर म्हणाले, 'आम्हाला शालेय वाहतुकीचा वेगळा परवाना घेण्याची गरज नाही. आमच्याकडे टप्पा वाहतुकीचा परवाना आहे. त्यामुळे शालेय वाहतुकीचा परवाना घेण्याची गरज वाटत नाही. तसेच आमचा कोणत्याही शाळेशी करार नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार सेवा देतो.
वरिष्ठ अधिकार्याची आरटीओत भेट नाही…
पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मोटार वाहन कायद्यातील शालेय वाहतुकीच्या नियमांचे योग्यरीत्या पालन व्हावे, याकरिता पीएमपीचे जनरल मॅनेजर व निवृत्त डेप्युटी आरटीओ सुबोध मेडशीकर या वरिष्ठ अधिकार्यांची नेमणूक केली आहे. मात्र, दोन दिवस उलटले, तरीदेखील या वरिष्ठ अधिकार्याने आरटीओमध्ये गाड्यांच्या परवान्यासाठी आणि मोटार वाहन कायदा, स्कूल बस अधिनियम 2011 च्या पालनासाठी आरटीओ कार्यालयात कोणत्याही अधिकार्यांशी संपर्क साधलेला नाही, अशी माहिती आरटीओ अधिकार्यांनी दिली. दरम्यान, पीएमपीने शालेय वाहतूकीसंदर्भात तत्काळ योग्य पाऊल न उचलल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
या 36 शाळांसोबत पीएमपीचा करार
1 विद्यानिकेतन क्रमांक 1 शिवाजी मराठा
2 विद्यानिकेतन क्रमांक 4 हडपसर
3 विद्यानिकेतन क्रमांक 5 बापोडी
4 विद्यानिकेतन क्रमांक 6 येरवडा
5 गोगटे शाळा विनि क्रमांक 7
6 विद्यानिकेतन क्रमांक 8 कर्वे पुतळा
7 वि.नि. क्रमांक पुणे विद्यापीठ / पाषाण लिंकरोड
8 विद्यानिकेतन क्रमांक 10 बिबवेवाडी
9 विद्यानिकेतन क्रमांक 11 वानवडी (मनपा 801/3 शाळा क्र. 62)
10 विद्यानिकेतन क्रमांक 12 पुणे स्टेशन उर्दू शाळा
11 विद्यानिकेतन क्रमांक 14 खुळेवाडी
12 विद्यानिकेतन क्रमांक 16 धायरी फाटा
13 विद्यानिकेतन 17 विश्रांतवाडी
14 विद्यानिकेतन क्रमांक 19 चंद्रभागानगर, भारती विद्यापीठ
15 के सी ठाकरे दारूवाला पूल (विनि. ब 3)
16 संत तुकाराम प्रा. विद्यालय (64जी, 16जी)
17 संत तुकाराम प्रा. विद्यालय मनपा शाळा क्र. 55 मुलांची पाषाण लिंकरोड
18 कन्नड शाळा (मंगळवार पेठ) शामराव कलमाडी
19 संत तुकाराम वि. नि. क्र. 20 (पाषाण बाणेर लिंकरोड)
20 क्रीडानिकेतन क्रमांक 80 बी सरिता नगरी (सिंहगड रोड)
21 क्रीडानिकेतन क्रमांक 83 बी माळवाडी हडपसर
22 क्रीडानिकेतन क्रमांक 187 वी के (येरवडा)
23 केंद्रीय विद्यालय एन डी ए गोल मार्केट
24 सणस ग्राउंड वसतिगृह
25 कटारिया स्कूल मुकुंदनगर
26 रेणूका स्वरूप भिकारदास
27 केंद्रीय विद्यालय आंध
28 आर्मी पब्लिक स्कूल (डेक्कन कॉलेज कॉर्नर)
29 आगरकर हायस्कूल (रास्तेवाडा, सोमवार पेठ)
30 कामायनी शाळा गोखलेनगर
31 मूकबधिर स्कूल (प्राधिकरण निगडी)
32 कामायनी (प्राधिकरण निगडी)
33 साईसंस्कार संभाजीनगर
34 ब—ह्मदत्त प्राधिकरण
35 अपंग विद्यालय (काळभोरनगर)
36 व्यंकटेश्वरा (खानापूर)
एकूण शाळासंख्या- 36
शाळांना पीएमपीच्या 56 बस गाड्या सेवा पुरवितात