पिंपरी : महापालिकेकडून मतदार याद्यांची विक्री

पिंपरी : महापालिकेने प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. आतापर्यंत छापील 51 मतदार यादीची विक्री झाली असून, त्यातून पालिकेस सुमारे 51 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, पेनड्राईव्हमध्ये यादी मोफत अपलोड करून दिली जात आहे. पालिकेने 1 ते 46 प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवारी (दि.21 ) प्रसिद्ध केली आहे.
ती यादी पालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदार यादी विक्रीसाठी पालिका भवनातील तळमजल्यावर असलेल्या निवडणूक विभागास उपलब्ध आहेत. छापील 51 मतदार याद्यांची आतापर्यंत विक्री झाली आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी केले आहे.