पिंपरी : प्राप्त हरकतीवर आजपासून सुनावणी पीएमआरडीएकडून कार्यक्रम जाहीर | पुढारी

पिंपरी : प्राप्त हरकतीवर आजपासून सुनावणी पीएमआरडीएकडून कार्यक्रम जाहीर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ‘पीएमआरडीए’कडे प्राप्त हरकतीवर बुधवार, दि 27 पासून सुनावणी होणार आहे. पुणे महानगर प्रदेशाची प्रारुप विकास योजना दि. 2 ऑगस्ट 2021 रोजीच्या सुचनेअन्वये प्रसिद्ध झाली असून, प्राप्त हरकती / सूचनांवर सुनावणी देण्यासाठी महानगर नियोजन समिती तयार करण्यात आलेली आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर दि. 27 जुलै 2022 ते दि. 3 ऑगस्ट 2022 या कालावधीतील, सकाळी 10 ते 1.30 व दुपारी 2.30 ते 5.00 दरम्यान सुनावणी होणार आहे.

हवेली ग्रामीण क्षेत्रामधील वाडेबोल्हाई, साष्टे, गावडेवाडी, मुरकुटेनगर, शिरसवडी, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, सांगवी सांडस, न्हावी सांडस, अष्टापूर, बिवरी, शिंदेवाडी, हिंगणगाव, तरडे, वळती, आर्वी, आळंदी, म्हातोबाची,गोगलवाडी, टिकेकरवाडी, खामगाव टेक, गौउडदरा, शिंदवणे, कोंढणपूर, अवसरे, तानाजीनगर, आंबी, जांभुळी, सोनापूर, सांगरुन, बहुली, भगतवाडी, वडदरे,मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, मालखेड, खामगाव मावळ, थोपटेवाडी, मोरदरवाडी, मणेरवाडी, कुडजे, गोर्‍हे खुर्द, गोर्‍हे बुद्रुक, मोकरवाडी, रहाटवडे, सांबरेवाडी, कल्याण, डोणजे, आगळंबे, वांजळेवाडी, बहुली, घेरा सिंहगड, खानापूर, खडकवाडी, खाडेवाडी.

शिरुर ग्रामीण क्षेत्र 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत पुढील गावात सुनावणी होणार आहे. अमदाबाद, बुरुंजवाडी, दरेकरवाडी, चिंचोली, धामारी, डिंग्रजवाडी, मलठण, पिंपळे धुमाळ, लाखेवाडी, केंदूर, राउतवाडी, साष्टाबाद, विठ्ठलवाडी, वाघाले, मुखई, पिंपळे जगताप, सोनेसांगवी,गणेगाव, बुरुंजवाडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, कासारी, करडे, आंधळगाव, चव्हाणवाडी, आंबळे, बाभुळसर खुर्द,भांबार्डे, दहीवाडी, करंजावणे, कोहकडेवाडी, निमगाव भोगी, गोलेगाव, शिरुर, टाकळी भिमा, उरळगाव, पिंपरी धुमाळ, पारोडी, निमोने, खंडाळे, नागरगाव, अरणगाव, आलेगाव पागा, राक्षेवाडी, रांजणगाव सांडस, हिवरे, कान्हूर मेसाई, करंडी, कोंढापूरी आदी गावांचा समावेश आहे. या गावांकरीता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी (पिंपरी-चिंचवड)येथे सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

Back to top button