पुणे : मोरगावात विषाणूयुक्त आजाराचे रुग्ण

मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विषाणूयुक्त आजारांच्या रुग्णांवर उपचार करताना डॉ. अनिल वाघमारे व डॉ. अभिनव पुरोहित, दुसर्‍या छायाचित्रात रुग्णालयात रुग्णांची रांग (छाया : अशोक वेदपाठक)
मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विषाणूयुक्त आजारांच्या रुग्णांवर उपचार करताना डॉ. अनिल वाघमारे व डॉ. अभिनव पुरोहित, दुसर्‍या छायाचित्रात रुग्णालयात रुग्णांची रांग (छाया : अशोक वेदपाठक)

मोरगाव, पुढारी वृत्तसेवा : मोरगाव (ता. बारामती) परिसरात हवामानाच्या बदलामुळे विषाणूयुक्त आजाराचे रुग्ण घरोघरी आढळत आहेत. दररोज सुमारे 75 रुग्णांची नोंद होत असल्याचे मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगितले जात आहे.

सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे अशा रुग्णांमध्ये आढळत आहेत. त्यांच्यावर मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत डॉ. अनिल वाघमारे व डॉ. अभिनव पुरोहित उपचार करीत आहेत. रोज सुमारे 75 रुग्णांना तपासून औषधोपचार व आरोग्यविषयक सल्ला देत असल्याचे डॉ. अभिनव पुरोहित यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एकवीस गावे व 8 उपकेंद्रे आहेत. केंद्राचे परिक्षेत्र पंचवीस किलोमीटर अंतराचे आहे. प्रा. केंद्रांतील एकवीस गावांतील लोकसंख्या सुमारे बेचाळीस हजार आहे. गावात आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका या रुग्णांचे सर्वेक्षण करून प्राथमिक उपचार करत आहेत. तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे अवाहन करीत आहेत. कार्यक्षेत्रात डेंग्यूच्या साथीचीही शक्यता असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आरोग्य केंद्राच्या वतीने सांगण्यात येत आहे.

मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत दर बुधवार व शनिवारी कोरोनाची प्रिकॉशन लस देण्यात येत आहे. विषाणू आयुक्त आजाराची लक्षणे आढळल्यास ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news