वाहतूक नियंत्रक दिवे दापोडीत गेले झाकाळून | पुढारी

वाहतूक नियंत्रक दिवे दापोडीत गेले झाकाळून

दापोडी: शितळादेवी चौक येथील वाहतूक नियंत्रक दिवे झाडाच्या फांदीमध्ये झाकाळून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक दिवे न दिसल्यामुळे चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्यावतीने लाखो रुपये खर्च करून मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे दिवे झाडांच्या फांद्यामध्ये झाकाळून गेल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

रात्री व दिवसा झाडांच्या फांदीमध्ये वाहतूक दिवे झाकून गेल्यामुळे व चालकांना ते न दिसल्यामुळे भरधाव वेगाने असलेल्या वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबावे लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाने प्रमुख चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्यांची पाहणी करावी, अशी मागणी सुधीर जम यांनी केली आहे. दिवे अडकलेल्या झाडाच्या फांद्या छाटणी करून वाहतूक दिवे मोकळे करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Back to top button