पिंपरी : पिंपळे गुरवमधील चौक लाल मातीमुळे निसरडा | पुढारी

पिंपरी : पिंपळे गुरवमधील चौक लाल मातीमुळे निसरडा

पिंपरी : पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊनच्या चौकात पंधरा दिवसांपासून लाल माती पडली आहे. त्यामुळे चौक निसरडा झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सगळीकडे विकासकामे सुरू आहेत. तर, काही ठिकाणी अर्धवट ही कामे दिसत आहेत. संततधार पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच रस्त्याच्याकडेला डक्टमध्ये लाल माती टाकली आहे.

पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊनच्या चौकात एकाच ठिकाणी लाल माती टाकून ठेवली आहे. आता ती माती चिखल युक्त झाल्यामुळे चौकात वळण घेताना अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर चौकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांनी केला आहे.

Back to top button