पुणे : कर्ज थकल्याने पाठविले अश्लील व्हिडीओ

पुणे : कर्ज थकल्याने पाठविले अश्लील व्हिडीओ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ऑनलाइन अ‍ॅपद्वारे घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास वेळ लागला म्हणून, एका महिलेच्या फोटोचा वापर करून अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो व्हिडीओ संबंधित महिलेला पाठवून व्हायरल करण्याची धमकी देऊन शिवीगाळ देखील करण्यात आली. याप्रकरणी वारजे परिसरातील 38 वर्षीय महिलेने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन रामदर्श, रंजनकुमार मोहपत्रा, एस. के. अब्दुर रहीम, दलीप कुमार नावाच्या चार व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने रुपे ऑनलाइन नावाच्या एका अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले होते. मात्र, काही कारणांमुळे फिर्यादी महिलेला कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर झाला.

दरम्यान, आरोपींनी महिलेला कर्ज देताना अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले होते. त्याचवेळी महिलेच्या मोबाईलचा ताबा घेऊन 'कॉन्टॅक्ट' मधील यादी व इतर माहिती चोरी करून घेतली होती. पुढे त्याच माहितीचा वापर करून पॅनकार्ड व आधारकार्डवरील फोटो घेऊन ते एडिट करून फिर्यादींचा अश्लील व्हिडीओ तयार केला. फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल या उद्देशाने तो व्हिडीओ त्यांना पाठवला. त्यानंतर कर्जाचे पैसे लवकर भरले नाहीत, तर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. वारजे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news