पिंपरी : बाजारपेठांत डाळिंब आणि पेरूला मागणी | पुढारी

पिंपरी : बाजारपेठांत डाळिंब आणि पेरूला मागणी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री बाजारपेठ व मोशी येथील उपबाजारामध्ये डाळिंब आणि पेरूला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. शहरात डाळिंबाची पंढरपूर, इंदापूर व सांगोला येथून आवक होते. यामध्ये भगवा आणि गणेश जातीच्या डाळिंबाला मोठी मागणी आहे.

तर पेरूची इंदापूर, शिर्डी, श्रीरामपूर व सासवड या भागातून आवक होत आहे. त्याच सोबत मोसंबीची आवक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. सिझनमधील फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम असते, असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे नागरिक देखील पेरू आणि डाळिंबाची खरेदी करताना बाजारपेठांमध्ये दिसून येतात.

फळ किलो (दर रुपये)
डाळिंब 50-120
पेरू 40-80
मोसंबी 60-70

Back to top button