पिंपरी : एसटीचा संप मिटताच पीएमपीचे तीन मार्ग बंद | पुढारी

पिंपरी : एसटीचा संप मिटताच पीएमपीचे तीन मार्ग बंद

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: एसटीचा संप मिटल्याने भोसरी ते जुन्नर, मंचर, भीमाशंकर या मार्गांवर पीएमपीएमएलने सुरू केलेल्या बस बंद करण्यात आल्या आहेत. पीएमपीएमएलने भोसरी ते जुन्नर (शिवनेरी), भोसरी ते मंचर व मंचर ते घोडेगाव तसेच भोसरी ते भीमाशंकर साखर कारखाना या मार्गावर बस सुरू केल्या होत्या. धुमधडाक्यात त्याचे उद्घाटनही करण्यात आले होते.

मात्र, राज्य परिवहन महामंडळाचा संप मिटल्यानंतर या मार्गावरील पीएमपीएमएलच्या बसेस बंद करण्यासाठी एसटी महामंडळाचा दबाव वाढत होता.त्यामुळे या मार्गावरील बसेस संख्या कमी करून प्रत्येकी एकेक बस सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, तीन दिवसांपूर्वी याही बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता केवळ एसटीचा आधार घेण्याची वेळ आली आहे. याबाबतच्या वृतास पीएमपीएमएलचे अधिकारी काळूराम लांडगे यांनी दुजोरा दिला आहे.

Back to top button