पिंपरी : पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; पतीस अटक | पुढारी

पिंपरी : पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; पतीस अटक

पिंपरी : पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पतीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (23 रोजी) पहाटे साडेतीन वाजता रहाटणी परिसरात घडली आहे. महिला फिर्यादी (वय 39) यांनी आरोपी रूपेश मच्छिंद्र साबळे (वय 32, रा. शिवारगार्डन परिसर, रहाटणी) याच्यासोबत पुनर्विवाह केला होता.

फिर्यादी यांच्या पहिल्या लग्नातून जन्मलेल्या अपत्याच्या नावापुढे माझ नाव लावत नाही, तू मला नवर्‍यासारखी वागणूक देत नाही. म्हणून आरोपी हा फिर्यादीस सतत मारहाण व शिवीगाळ करीत होता. पहाटे साडेतीन वाजता फिर्यादी गाढ झोेपेत असताना आरोपी पतीने त्यांचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

याविरोधात महिलेने वाकड पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करून कलम 307, 498(अ), 323,504 अंतर्गत जिवे मारण्याचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल केले आहेत.

Back to top button