मंचर : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार | पुढारी

मंचर : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

मंचर : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी बिबट्याने कोल्ह्यावर हल्ला केला होता. तर शनिवारी (दि. 23) रात्री खारावस्तीतील शेतकरी मच्छिंद्र रघुनाथ पोंदे यांच्या नऊ महिने वयाच्या गाईच्या कालवडीवर हल्ला केला.
कालवड ठार झाल्याने शेतकर्‍याचे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बिबट्यांचे हल्ले पाळीव प्राण्यांवर होत असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे पोंदेवाडी या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांनी मंचर वनविभागाकडे केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. पूर्व भागात उसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. यामुळे बिबट्याला याठिकाणी राहण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

Back to top button