पुणे : बंद पाइप लाइनच्या कामासाठी 27 कोटी मंजूर ; आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

पुणे : बंद पाइप लाइनच्या कामासाठी 27 कोटी मंजूर ; आमदार संग्राम थोपटे यांची माहिती
Published on
Updated on

भोर : पुढारी वृत्तसेवा : निरादेवघर प्रकल्पांतर्गत असलेल्या बंद पाइप लाइनव्दारे होणार्‍या डाव्या कालव्याच्या कामाला 28 कोटी 47 लाख 58 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या कालव्यामुळे 17 गावांतील सुमारे 1111 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.  भोर येथील रायरेश्वर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत थोपटे यांनी याबाबत माहिती दिली. या वेळी माजी जि.प सदस्य विठ्ठल आवाळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अतुल शेडगे, बबन खाटपे, सुरेश राजिवडे, संजय मळेकर, शंकर पारठे, संजय पारठे, नथु दामगुडे, भिकाजी कोंढाळकर, संभाजी मोहिते, संपत साळुंके, दीपक कुमकर, दीपक गायकवाड, रमेश दुधाणे आदी उपस्थित होते.

निरादेवघर धरणाच्या पावर हाऊसजवळून पाणी उचलून बंद पाइप लाइनने डावा कालव्याद्वारे म्हसर बु, म्हसर खु, निगुडघर, करंजगाव, आपटी, नांदगाव, वाठार, पिसावरे, महुडे बु., महुडे खु., ब—ाह्मणघर, नांद, शिंद, गवडी, किवत, भोलावडे या 17 गावांना सोडले जाणार आहे. यामध्ये सुमारे 1111 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असून, सदर कालव्याची लांबी सुमारे 18 किलोमीटर आहे. पूर्वीचा डावा कालवा 21 किलोमीटर लांबीचा होता. त्यात 14 गावांचा समावेश होता. स्थानिक ग्रामस्थांची आग्रही मागणी लक्षात घेऊन 3 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

भोर – वेल्हा प्रकल्पग्रस्त समिती यांचे विषयांकित प्रकरणी असलेली आग्रही भूमिका विचारात घेऊन डावा कालव्याचे व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम बंद नलिकेद्वारे करण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाचा अंतर्भाव सन 2019/20 चे सूचीमध्ये करण्यात आला.सदर कामाचे कार्यारंभ आदेश 23/12/2019 रोजी देण्यात आले. निरादेवघर व गुंजवणी प्रकल्पाच्या प्रलंबित कामांसंदर्भात जलसंपदामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत 28 जानेवारी 2020 रोजी मंत्रालयात बैठक झाली होती. सदर बैठकीत निरा देवघर प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यताप्राप्त प्रकल्प अहवालानुसार निरा देवघर उजवा कालव्याच्या किलोमीटर 6 मधून सा.क. 5/580 येथून निरा देवघर डावा कालवा प्रस्तावित होता. सदर कालव्याचा विसर्ग 0.62 घ.मी. इतका आहे व कालव्याची लांबी 18 किलोमीटर आहे. सदर बंद नलिका डावा कालव्याचा लाभ भोर तालुक्यातील 17 गावांना मिळणार आहे. सद्यःस्थितीत निरा देवघर डावा कालव्याचे काम बंद नलिकेद्वारे करणे या कामाचा समावेश सन 2022-23 च्या प्रपणसूचीमध्ये करण्यात आला आहे. सदर कामाची निविदा कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.

निरादेवघर धरणाचा डावा कालवा व्हावा म्हणून अनेक वर्षे पाठपुरावा करीत होतो. बंद पाइप लाइनमुळे कमी प्रमाणात जमीन जाऊन अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या महुडे बुदुक व महुडे खुर्द भागातून कालवा जाणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची सोय होणार आहे. कालव्याच्या कामाला 28 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच काम सुरू होईल.
                                                                             -संग्राम थोपटे, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news