पुणे : गेल्या 15 दिवसांत डेंग्यूचे 27 रुग्ण; प्रादुर्भाव होतोय कमी

पुणे : गेल्या 15 दिवसांत डेंग्यूचे 27 रुग्ण; प्रादुर्भाव होतोय कमी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. पावसाळा संपेपर्यंत जलजन्य, कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव कायम राहणार आहे. मात्र, सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 27 रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जानेवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत डेंग्यूचे 2952 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 305 जणांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. चिकन गुनियाचे आतापर्यंत 95 रुग्ण आढळून आले आहेत. पाणी साठल्याने डासांची पैदास होत असलेल्या 2250 ठिकाणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून 1 लाख 69 हजार 550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात शहरात 1062 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 73 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. घरात पाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, डासांची पैदास होणार्‍या ठिकाणांची त्वरित स्वच्छता करावी, घरात आणि परिसरात स्वच्छता राखावी, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news