धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराकडून प्रेयसीचे लैंगिक शोषण

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराकडून प्रेयसीचे लैंगिक शोषण

पुणे : अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख करून घेत तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या एकावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत 17 वर्षांच्या मुलीच्या आईने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 महिन्यांपूर्वी लोहियानगर येथील एका हॉटेलमध्ये घडला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरिजा म्हस्के करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news