मंचर : अमरनाथ यात्रेवरून भाविक सुखरूप परतले

मंचर : अमरनाथ यात्रेवरून भाविक सुखरूप परतले

मंचर, पुढारी वृत्तसेवा: मंचर येथील अमरनाथ सेवा संघाच्या वतीने अमरनाथ यात्रेसाठी गेलेले साडेतीनशे भाविक नुकतेच मंचर येथे सुरक्षितरित्या परतले. भाविक सुखरूप माघारी आल्यानंतर नातेवाइक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेदिवशी यात्रेचा दुसरा दिवस होता. त्यानंतर पाच दिवसांनी सर्वांचे महादेवांचे दर्शन होते. जलप्रलयाच्या भीतीने सर्वांच्या मनामध्ये शंका कुशंका होत्या. टीव्हीवरील बातम्या पाहून घरचे फोन करत होते. मात्र, अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर यांनी सर्वांना नक्की दर्शनाचा लाभ होणार, असे सांगितले.

दर्शनाच्या दिवशी खूप पाऊस, निसरडा रस्ता, भरपूर अशी गर्दी अशा स्थितीत आयोजकांनी सर्वांना गुरूपौर्णिमेच्या दिवशी देवदर्शन घडवले. दिलीप महाजन, पंडित मशिरे, गणपत क्षीरसागर, अवधूत शेटे, शेखर चौधरी आदींचा अनुभव याकामी मोलाचा ठरला. वैष्णव देवी दर्शन, श्रीनगर जम्मू येथील भारत पाकिस्तान सीमा सूचित गड दर्शन यावर्षी अमरनाथ सेवा संघाने घडवले. श्रीक्षेत्र भीमाशंकर व श्रीक्षेत्र तपनेश्वर मंचर येथे प्रत्येक श्रावणी सोमवारी व महाशिवरात्री संघातर्फे भव्य अशा भंडार्‍याचे नियोजन भक्तांसाठी केले जात असल्याचे शेखर चौधरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news