बारामती : पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी जिव्हाळा महिना

बारामती : पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी जिव्हाळा महिना
Published on
Updated on

बारामती, पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 22 जुलैपासून पुढील महिनाभर बारामती तालुक्यात 'राष्ट्रवादी जिव्हाळा महिना' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी ही माहिती दिली. वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 22) गावोगावी ग्रामदैवताला अभिषेक घालण्यात येणार आहे. महापूजा केली जाणार आहे. राष्ट्रवादी भवनात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी केक कापून शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तालुक्यात 22 जुलै ते 22 डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे.

गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांना शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय ज्येष्ठांचा सन्मान, कामगार मेळावा, दत्तक गाव योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभ, रक्तदान शिबिरे, व्यवसाय प्रशिक्षणे, आरोग्य शिबिरे, जलसंधारण कामासाठी मदत, विविध व्याख्याने, क्रीडा स्पर्धा, प्रत्येक विद्यालय, महाविद्यालयांना सुविधा उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक कार्यक्रम, नोकरी महोत्सव, सहकारी संस्था, ग्रामपंचायत, पक्ष कार्यकर्ते, सदस्य व पदाधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण असे शेकडो उपक्रम राबविले जाणार असल्याचे होळकर म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news