पिंपरी : राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपकडून आनंदोत्सव | पुढारी

पिंपरी : राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपकडून आनंदोत्सव

पिंपरी : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे मंडलनिहाय सहा ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याशिवाय, आमदार महेश लांडगे यांचे वडील किसनराव लांडगे यांनी खेड तालुक्यातील कडुस येथील ठाकरवस्ती या आदिवासी पाड्याला भेट देऊन तेथे मिठाई वाटप केले.

निगडी- चिखली मंडलाच्या वतीने चिंचवड-केएसबी चौकात जल्लोष करण्यात आला. भोसरी-चर्‍होली मंडलाच्यावतीने पीएमटी चौक (भोसरी), पिंपरी-दापोडी मंडलाच्यावतीने संत तुकारामनगर, प्राधिकरण-चिंचवड स्टेशन मंडलाच्या वतीने टिळक चौक (निगडी), चिंचवडगाव-किवळे मंडलाच्यावतीने ममिली चौक (वाल्हेकरवाडी) आणि सांगवी-किवळे मंडलाच्या वतीने पंचनाथ चौक (काळेवाडी) येथे जल्लोष करण्यात आला.

या वेळी सर्व मंडल अध्यक्ष, आमदार उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजप चिंचवड विधानसभाप्रमुख शंकर जगताप आदींनी
सहभाग घेतला.

Back to top button