पुणे : तृतीयपंथीयावर कोयत्याने वार | पुढारी

पुणे : तृतीयपंथीयावर कोयत्याने वार

पुणे : बरोबर जाण्यास नकार दिल्याच्या कारणातून चौघांनी एका तृतीयपंथीयावर कोयत्याने वार केले. कात्रज-मंतरवाडी रस्त्यावर हडपसर परिसरात गेल्या 12 जुलै रोजी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी चौघा अनोळखी व्यक्तींवर हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तृतीयपंथीय हा रात्रीच्या वेळी घरी निघाला होता. त्या वेळी चार जणांनी त्याला आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्याला त्याने नकार दिला. त्या कारणातून आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या मानेवर कोयत्याने वार केला. यात फिर्यादीला गंभीर दुखापत झाली होती. हॉस्पिटलमधून उपचार घेतल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

Back to top button