पुणे : गणित शिका आता ई-साहित्यातून; विद्यार्थ्यांना अ‍ॅपवरून मिळणार मार्गदर्शन | पुढारी

पुणे : गणित शिका आता ई-साहित्यातून; विद्यार्थ्यांना अ‍ॅपवरून मिळणार मार्गदर्शन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित या विषयातील संपादणूक वाढण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाकडून गणिताचे ई-साहित्य विकसित करण्यात येत आहे. हे साहित्य दीक्षा अ‍ॅप, यूट्यूब वाहिनीसह विविध माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. गणिताचे ई-साहित्य निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून प्रशासकीय आणि 16.50 लाखांच्या निधी मान्यतेसंदर्भातील शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला.

राज्यात दक्षा अ‍ॅपचा वापर अधिक प्रभावी पद्धतीने होण्याच्या दृष्टीने मराठी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचे ई-साहित्य तयार करण्याबाबत विद्या प्राधिकरणामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. याअंतर्गत ई-साहित्य निर्मितीसाठी आवश्यक साधनांची खरेदी, व्हिडिओ निर्मिती, भाषांतर अशा खर्चांसाठी निधी मंजूर करण्यात आला. विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड म्हणाले, ‘राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ई-साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी खान अ‍ॅकॅडमीच्या साहाय्याने प्रकल्प राबवण्यात येत आहे.

Back to top button