पिंपरी : कोरोनाचे 231 बाधित रुग्ण, गृहविलगीकरणात 1 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरू | पुढारी

पिंपरी : कोरोनाचे 231 बाधित रुग्ण, गृहविलगीकरणात 1 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे बुधवारी (दि. 20) दिवसभरात 231 बाधित रुग्ण आढळले. तर दिवसभरात 238 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात सध्या गृहविलगीकरणात 1 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

तर रुग्णालयांमध्ये 15 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात 1 हजार 302 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 3 लाख 66 हजार 1 इतके बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 60 हजार 789 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, 4 हजार 625 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button