

पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्कूल बसचालकाकडून नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आरटीओकडून 'वन डे ऑपरेशन' राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील 51 शाळांना भेटी देत एका दिवसात 358 शालेय वाहनांची झाडाझडती घेण्यात आली.
शालेय वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्यवस्थितरित्या होत आहे का? या वाहनांमध्ये महिला सहाय्यक आहे का, वाहनाची फिटनेस तपासणी व्यवस्थित झाली आहे का, गाडीचा इन्शुरन्स आहे का, यांसह अनेक नियमांची आरटीओच्या 40 ते 50 मोटार वाहन निरीक्षकांच्या पथकाने एका दिवसात तपासणी केली. या वेळी दोषी आढळलेल्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करण्यात आली. मंगळवार (दि.19) ही मोहीम राबिवण्यात आली.
शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली. याअंतर्गत 358 शालेय वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून, शाळा प्रशासनालादेखील सूचना करण्यात आल्या आहेत.
– संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे