पुणे : आरटीओचे ‘वन डे ऑपरेशन’; दिवसभरात 358 शालेय वाहनांची झाडाझडती | पुढारी

पुणे : आरटीओचे ‘वन डे ऑपरेशन’; दिवसभरात 358 शालेय वाहनांची झाडाझडती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्कूल बसचालकाकडून नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आरटीओकडून ‘वन डे ऑपरेशन’ राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील 51 शाळांना भेटी देत एका दिवसात 358 शालेय वाहनांची झाडाझडती घेण्यात आली.
शालेय वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्यवस्थितरित्या होत आहे का? या वाहनांमध्ये महिला सहाय्यक आहे का, वाहनाची फिटनेस तपासणी व्यवस्थित झाली आहे का, गाडीचा इन्शुरन्स आहे का, यांसह अनेक नियमांची आरटीओच्या 40 ते 50 मोटार वाहन निरीक्षकांच्या पथकाने एका दिवसात तपासणी केली. या वेळी दोषी आढळलेल्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करण्यात आली. मंगळवार (दि.19) ही मोहीम राबिवण्यात आली.

  • शालेय वाहनांसाठी वाहतुकीचे महत्त्वाचे नियम
  • शालेय विद्यार्थी वाहतूक परवाना आवश्यक
  • वाहनाचा रंग पिवळा हवा
  • वाहनात महिला सहायक असावी
  • अग्निशामक उपकरण बसविणे आवश्यक
  • खिडकीच्या बाहेरील बाजूस आडवे लोखंडी बार गरजेचे
  • आपत्कालीन दरवाजा असावा
  • धोक्याचा इशारा देणारी प्रकाश योजना व घंटी
  • वाहनांवर विद्यार्थ्यांचे सांकेतिक चित्र
  • प्रथमोपचार पेटीची सुविधा असावी
  • शालेय वाहतुकीचा परवाना असावा.
  • वाहनाचा विमा असावा.
  • आसनक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरू नये.

शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली. याअंतर्गत 358 शालेय वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून, शाळा प्रशासनालादेखील सूचना करण्यात आल्या आहेत.
                                       – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button