

देहूरोड : शेलारवाडी येथील दळणवळणाचा एकमेव मार्ग असलेल्या भुयारी मार्गात पाणी साठले आहे. त्यात आता रेल्वे गेट देखील दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद राहणार आहे. यामुळे शेलारवाडीतील ग्रामस्थांना दोन दिवस त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
शेलारवाडीतील ग्रामस्थांना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे.
शहराशी जोडणार्या मुख्य मार्गावर भुयारी रस्ता करण्यात आला आहे; मात्र त्यात पावसाचे पाणी साचल्याने हा रस्ता बंद झाला आहे.
शेलारवाडी स्थानकात जवळून रस्ता आहे; मात्र त्याचे फाटक दोन दिवस बंद राहणार आहे. याची पूर्वसूचना गावकर्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे शेलारवाडी गावातील शहराशी जोडणारे दोन्ही रस्ते बंद झाले आहेत. अचानक कोणी आचारी पडल्यास किंवा तातडीची गरज पडल्यास वाहने असूनही उपयोग नाही, अशी अवस्था गावकर्यांची झाली आहे.
रेल्वेच्या संबंधित अधिकार्यांशी ग्रामस्थांनी संपर्क साधला असता त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. किंबहुना भुयारी मार्गातील पाणी काढण्याचा विषयावर कुठलेही ठोस भूमिका व्यक्त करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाली आहेत. गावातील वीस मुले शिक्षणासाठी देहूरोड येथे येतात. तर हायस्कूल आणि कॉलेजमध्ये अनेक या मार्गावरून ये-जा करत असतात. त्यांच्यावर रेल्वे रूळ ओलांडून पायपीट करण्याची वेळ आली आहे.