पिंपरी : सराईत गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

पिंपरी : सराईत गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी : खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत नातेवाइकांनी गोंधळ घातला. ही घटना मंगळवारी चिंचवड येथे घडली. रोहित चव्हाण (वय 28) असे मृत्यू झालेल्या सराइताचे नाव आहे. याप्रकरणी रोहित याच्या पत्नीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अरबाज इस्माईल शेख (23, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहित याने आरोपी अरबाज याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते.

त्याचा राग मनात धरून अरबाज याने रोहितला मारहाण केली. तसेच, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रोहितच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. दरम्यान, शुक्रवारी (दि.15) रोहितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button