धायरीत पाच मजली अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा | पुढारी

धायरीत पाच मजली अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा

धायरी : धायरी येथे पाच मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात येऊन पाच स्लॅब ब्रेकरच्या सहाय्याने पाडण्यात आले.
ही कारवाई पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र. 2 यांच्या वतीने करण्यात आली. येथील सर्व्हे 8 बेनकर वस्ती, धायरी पुणे येथे ही कारवाई करण्यात आली.

पुणे महानगरपालिका बांधकाम झोन क्र. 2 यांच्या वतीने ही कारवाई कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता राहुल तिखे, कनिष्ठ अभियंता संदेश पाटील, निशिकांत छापेकर, रितेश शिंदे यांच्या पथकाने केली. या वेळी तीन ब्रेकर, दोन जेसीबी व वीस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

Back to top button