

कोरेगाव पार्क : महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एम फक्टो) या प्राध्यापक संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले.
या मागण्यात प्रामुख्याने उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून चार फेब्रुवारी 2013 ते दहा मे 2013 या कालावधीत केलेल्या परीक्षा बहिष्कार आंदोलनाचा 71 दिवसांच्या पगाराचा परतावा मिळावा, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रेग्युलेशननुसार समग्र योजना जशीच्या तशी लागू करणे बंधनकारक असून, त्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करावी तसेच अर्धवेळ महाविद्यालयीन शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, युजीसीच्या धोरणानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांची शंभर टक्के रिक्त पदे भरण्यात यावीत, त्याचप्रमाणे सहसंचालक व वरिष्ठ लेखापरीक्षक यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात यावा. एम. फिल पदवी प्राप्त व 1992 ते 2010 नियुक्त प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा, प्राध्यापकांना कँसचे लाभ वेळेत मिळावेत, अशा विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी आंदोलन करीत असल्याचे वाडिया महाविद्यालयाचे डॉ. सुभाष अहिरे यानी सांगितले.