पुणे: रस्त्यावरील खड्ड्यांत झाड लावून आंदोलन | पुढारी

पुणे: रस्त्यावरील खड्ड्यांत झाड लावून आंदोलन

महर्षिनगर : अतिवृष्टीमुळे उपनगरातील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने मनसेकडून खड्डापूजन व झाड लावणे आंदोलन करण्यात आले. पर्वती मतदारसंघात विविध ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यात झाड लावणे आंदोलन घेण्यात आले. निवडणुकीच्या कामाचे कारण पुढे करीत बिबवेवाडी सहायक आयुक्त रस्तादुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

धोकादायक वृक्षतोड, खड्डे बुजविणे, ड्रेनेज व पावसाळी वाहिन्या तुंबणे यांसारख्या समस्या क्षेत्रीय कार्यालय किरकोळ समजत आहे. याविषयी आता आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. मनसेकडून पर्वतीत सहकारनगर, पर्वती, महर्षिनगर भागात आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनात मनसेचे अध्यक्ष विक्रांत अमराळे बाळाभाऊ शेडगे, जयराज लांडगे, संतोष पाटील, सचिन काटकर, अभिजित टेंभेकर आदी सहभागी झाले होते.

Back to top button