पुणे : सावत्र आईची हत्या करणारा अद्याप फरार

पुणे : सावत्र आईची हत्या करणारा अद्याप फरार
Published on
Updated on

भोर, पुढारी वृत्तसेवा : भोर शहरात एक महिन्यापूर्वी सावत्र आईच्या डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने वार करून हत्या करणारा आरोपी गेल्या वीस दिवसांपासून फरार आहे. शोध घेण्याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडले नाही, तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

भोर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वडिलांबरोबर दुसरे लग्न करून राहत असल्याचा राग मनात धरून आरोपी शिवम अकुंश शिंदे याने बुधवारी (दि. 29) पहाटे 5 च्या सुमारास सावत्र आई रेश्मा अकुंश शिंदे हिचा धारदार शस्त्राने व दगडी पाटा डोक्यात घालून हत्या केली व फरार झाला. वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशावरून भोर पोलिसांनी विशेष पथके आरोपीच्या शोधासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पथकेही फरार आणि आरोपीही फरार, अशी अवस्था झाली आहे.

आरोपीला ताब्यात घेतले नाही, तर त्यांच्यापासून कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेऊन ताब्यात घ्यावे; अन्यथा भोर पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईक आणि बाजारवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

वरिष्ठ कार्यालयाची नुसतीच झकासी

भोर शहरात व परिसरात अनेक लहान-मोठ्या घटना घडत असतात. परंतु, वरिष्ठपातळीवरील अधिकारी तेवढ्यापुरते घटनास्थळाला भेट देऊन आरोपींना पकडण्याचे आदेश देत असतात. या आदेशाचे पालन भोर पोलिस कर्मचारी करीत नसल्यामुळे आरोपी मोकाट होत आहेत. याबाबत वरिष्ठांकडून पुन्हा चौकशी होत नसून नुसती झकासी करण्यात पटाईत असल्याचे स्पष्ट होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news