पुणे : दरड कोसळून रस्ता बंद | पुढारी

पुणे : दरड कोसळून रस्ता बंद

भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने सावरली येथे सोमवारी (दि. 18) रस्त्यावर दरड कोसळून परिसरातील गावांचा संपर्क तुटला. या वेळी रस्त्याने कोणतीही वाहतूक व माणसांची ये-जा नसल्याने दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही.

सध्या भीमाशंकर व आहुपे, पाटण परिसरात मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुंडुब भरून वाहत आहेत. वादळी वार्‍यासह चार दिवस मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक रस्त्यांंवर पाणी वाहत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. सावरली गावचा हा रस्ता दळण-वळणासाठी उपयुक्त होता. मात्र, सोमवारी रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागात जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.

Back to top button