पुणे : कुटुंबनियोजनाचा भार स्त्रियांवरच! वर्षभरात पावणेदोन लाख महिलांनी केली शस्त्रक्रिया | पुढारी

पुणे : कुटुंबनियोजनाचा भार स्त्रियांवरच! वर्षभरात पावणेदोन लाख महिलांनी केली शस्त्रक्रिया

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 1 एप्रिल ते 31 मेदरम्यान कुटुंबनियोजन, लसीकरण, गर्भवती माता याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये साडेसात लाख घरांमधील 27 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंतर्गत 1 लाख 73 हजार 915 स्त्रियांनी, तर केवळ 82 पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत दर वर्षी सर्वेक्षण केले जाते.

नवविवाहित दांपत्यापासून ते मूल 5 वर्षांचे होईपर्यंत एकत्र नोंद ठेवता यावी, यासाठी सर्वेक्षणातील माहिती संकलित केली जाते. यावर्षी महापालिकेतर्फे 260 परिचारिकांच्या मदतीने दाम्पत्यांची प्राथमिक माहिती, कुटुंब नियोजनाबाबत विचार, त्यासाठी वापरण्यात येणारी साधने अशा माहितीची नोंद ठेवण्यात आली. यामध्ये 4 लाख 33 हजार 887 जोडपी प्रजननक्षम असल्याचे आढळून आले. यापैकी 3 लाख 12 हजार 940 जोडपी कुटुंब नियोजन साधनांचा वापर करत असल्याचे निष्कर्ष समोर आला आहे.

भ्रामक समजुती व भीतीपोटी पुरुषांचा नकार
नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुतीवर असलेला विश्वास तसेच अनेक रूढीपरंपरा सुशिक्षित समाजात आजही पाळल्या जात असल्याने कुटुंबनियोजनाची जबाबदारी ही महिलांवरच असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. महिलांच्या तुलनेत मोजकेच पुरुष या शस्त्रक्रिया करत असल्याचे वास्तव आहे. एकीकडे समाज शिक्षित होत आहे. पण अनेक भ्रामक समजुतींमुळे तसेच भीतीपोटी नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे पुरूषांकडून टाळले जात आहे. यामुळे कुटुंबनियोजनाचा भार हा महिलांवरच टाकला जात आहे.

भ्रामक समजुती व भीतीपोटी पुरुषांचा नकार
नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामकक समजुतीवर असलेला विश्वास तसेच अनेक रूढीपरंपरा सुशिक्षित समाजात आजही पाळल्या जात असल्याने कुटुंबनियोजनाची जबाबदारी ही महिलांवरच असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. महिलांच्या तुलनेत मोजकेच पुरुष या शस्त्रक्रिया करत असल्याचे वास्तव आहे. एकीकडे समाज शिक्षित होत आहे. पण अनेक भ्रामक समजुतींमुळे तसेच भीतीपोटी नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे पुरूषांकडून टाळले जात आहे. यामुळे कुटुंबनियोजनाचा भार हा महिलांवरच टाकला जात आहे.

Back to top button