पुणे शहरातही पावसाची घोडदौड; हंगामात 342 मिमीची नोंद | पुढारी

पुणे शहरातही पावसाची घोडदौड; हंगामात 342 मिमीची नोंद

पुणे : शहरात जुलै महिन्याच्या अठरा दिवसांत दररोज पाऊस पडत असून, जूनचे 30 दिवस व जुलैचे 18 दिवस, अशा 48 दिवसांत 342.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आगामी सहा दिवस शहरात हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. शहरात जूनमध्ये अवघा 35 मिमी पाऊस झाला होता. मात्र, जुलै उजाडताच पावसाला सुरुवात झाली.

1 ते 7 जुलैपर्यंत पावसाचा फारसा जोर नव्हता. 8 जुलैपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. 14 जुलैपर्यंत शहरात दमदार पाऊस झाल्याने शहराने जून व जुलैची सरासरी पार केली. जुलैची सरासरी तर 14 दिवसांतच पार केली. 18 जुलै रोजी शहरात 342 मिमी पावसाची नोंद झाली. पाषाण भागात 404 मिमी, लोहगाव 322 मिमी इतका पाऊस झाला आहे.

रविवारपर्यंत जोरदार
शहरात आगामी सहा दिवसांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 20 रोजी शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज आहे. शहरात 19 ते 24 पर्यंत ढगाळ वातावरण राहून, दररोज हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Back to top button