दिघी: योग्य आहार मानवी जीवनाचा मुलाधार : साध्वी डॉक्टर श्री सुशील जी म सा | पुढारी

दिघी: योग्य आहार मानवी जीवनाचा मुलाधार : साध्वी डॉक्टर श्री सुशील जी म सा

दिघी: पुढारी वृत्तसेवा : भारतीय संस्कृतीमध्ये मानवी शरीराच्या पोषणासाठी योग्य आहार महत्त्वाचा मानला जातो कारण अन्न हे शरीराच्या पोषणासाठी वाढीसाठी व तंदुरुस्तीसाठी महत्त्वाचे आहे अशी प्रतिपादन श्री ज्ञानवती महाराज यांच्यातून शिष्या दिवाकर रत्न डॉक्टर श्री सुशील जी महाराज यांनी भोसरी येथील वर्धमान स्थानक वाशी जैन श्रावक संघ आनंद दरबार येथे आयोजित वर्षावास कार्यक्रमात प्रवचन देताना व्यक्त केले.

यावेळी मधुर स्वर साधी का साध्वी श्री श्रद्धा जी महाराज श्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया कार्याध्यक्ष सागर साखला कचरदास गांधी माजी अध्यक्ष डॉ जवाहर भळगट, राजेंद्र चोरडिया ,सुभाष मामा चुतर शांतीलाल साळ, अरुण पारख प्रमोद चुतर, महिला अध्यक्ष कविता प्रदीप जी गांधी, उपाध्यक्ष सुवर्णा कटारिया, युवा अध्यक्ष संतोष नवलाखा आदी मान्यवर श्रावक श्राविका उपस्थित होत्या
चातुर्मास पर्वआत्मकल्याण या विषयावर शीघ्र कवी नंदलाल जी लुंकड यांनी स्तवन सादर केले नवकार कलश स्थापना श्री संघाचे जेष्ठ पदाधिकारी व महिला भाविकांचे हस्ते करण्यात आला.

साध्वी जी डॉ सुशील जी महाराज पुढे म्हणाल्या की आपल्या संस्कृतीमध्ये जैन आगम मध्ये ठळकपणे आरोग्य पचनक्रिया शास्त्रामध्ये सांगितले की आपला आहार प्रणाली आपले शरीर निरोगी ठेवते ज्याप्रमाणे होम , हवन, यज्ञ, रात्री भोजन करू नये जसे आपण अन्न भक्षण करतो त्याप्रमाणे आपले विचार आचार निर्माण होतात त्याचे प्रतिबिंब मानवी वर्तणुकीवर दिसते.

आरोग्य शास्त्र कर्करोगासारख्या आजारावर उपचार करून घेत असताना आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो त्याचे योग्य नियोजनाप्रमाणे रोगाचा प्रसार रोखणे अटकाव करणे यासाठी मदतकारक ठरतो त्यामुळेच अन्नाला भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण ब्रह्म म्हटले आहे आपल्या जेवणाच्या ताटामध्ये दोन तृतीयांश भाग हा कडधान्य भाज्या आणि फळे यांचा असावा योग्य आहार त्यामुळेच महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन शेवटी केले

Back to top button