कामशेत : पोलिसांची नजर चुकवून पर्यटक नाणे मावळात | पुढारी

कामशेत : पोलिसांची नजर चुकवून पर्यटक नाणे मावळात

कामशेत : नाणे मावळातील कोंडेश्वर मंदिर व त्याच्या बाजूला असणार्‍या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी जमावबंदीतही पर्यटक आल्याचे दिसून आले. मावळ तालुक्यातील नाणे मावळ हे पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरत आहे. हिरवेगार डोंगर, नयनरम्य निसर्ग शिवाय रस्त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगरातून वाहणारे पाणी व धबधबे याचा आनंद घेण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा येथनू पर्यटक आले होते.

जमावबंदीच्या आदेशामुळे पर्यटकांना माघारी फिरावे लागले. तर, काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून पर्यटनस्थांपर्यंत पोहोचलेले दिसून आले. त्यामुळे पवन मावळात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे
दिसून आले.

Back to top button