पिंपरी : ‘त्या’ मुलांचे शुल्क खासगी शाळांनी माफ करावे, मनसेच्या महिला आघाडीची आयुक्तांकडे मागणी | पुढारी

पिंपरी : ‘त्या’ मुलांचे शुल्क खासगी शाळांनी माफ करावे, मनसेच्या महिला आघाडीची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महिला विधवा झाल्या आहेत. त्यामुळे त्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढविले आहे. अशा महिलांच्या पाल्यांचे खासगी शाळेतील शुल्क पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने केली आहे.

कोरोना महामारीत अनेक जणांचे मृत्यू झाले. त्यात अनेक कुटुंबातीन कर्त्या पुरुषांचे निधन झाले. शहरातील अनेक महिला विधवा झाल्या आहेत. त्या महिलांवर अचानक आर्थिक संकट ओढविले आहे. अशा महिलांच्या मुलांकडून खासगी शाळेत नियमित शुल्क आकारणी केली जात आहे. भरमसाठ शुल्क भरताना महिलांची आर्थिक ओढाताण होत आहे.

कोरोनाच्या महामारीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला मदत म्हणून खासगी शाळांनी शुल्क आकारणी करू नये, अशी मागणी महिला आघाडीच्या शहर सचिव सीमा बेलापूरकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात शहरातील सर्व खासगी शाळांना आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. या वेळी संगीता देशमुख, श्रद्धा देशमुख, सुनीता तोडकर व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Back to top button