

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 'तू माझ्या मैत्रिणीबरोबर लग्न का केले, माझं तिच्यावर खुप प्रेम होतं. तू लग्न केलं म्हणून ती माझ्याशी बोलत नाही. तुला बघून घेईल' असे बोलत, लग्नापूर्वीचे अश्लील फोटो व व्हिडीओ सर्वांना पाठविण्याची धमकी आरोपीने फिर्यादीच्या नवर्याला दिली आहे. ही घटना मे 7 ते जुलै 15 दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल कैलास जंगम (वय 31 रा. वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक) याने फिर्यादी महिलेच्या नवर्यास वेळोवेळी आठ वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल करून, लग्नापूर्वीचे आरोपी व फिर्यादी यांचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हॉट्सअॅपद्वारे पाठविले आहेत.
हे सर्व फोटो आणि व्हिडीओ सर्व मित्रांना पाठविण्याची धमकी दिली आहे. सोबतच इस्टाग्रामवर फिर्यादी आणि तिच्या नवर्याचे फोटो ठेवून बनावट अकाउंट ओपन केले आहे. तू जर मला कॉल नाही केला तर इंस्टाग्रामवरही फोटो, व्हिडीओ अपलोड करेल, अशी धमकी आरोपीने फिर्यादीस दिली आहे.