तळेगाव परिसरात पावसाच्या सरीवर सरी | पुढारी

तळेगाव परिसरात पावसाच्या सरीवर सरी

तळेगाव दाभाडे : परिसरात पावसाच्या सरीवर सरी पडत आहेत.अधून मधुन उघडीप होवून सुर्यदर्शनही होत आहे. यावेळी दैनंदिन कामे उरकण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. भात लागवडीस सर्वत्र वेग आलेला असल्यामुळे मजुर मिळणेस अवघड होत आहे.  यामुळे शेतकरी सहकुटूंब भात लागवड करीत आहेत.

नागरिक तातडीचे कामाशिवाय घराबाहेर पडत नसल्यामुळे बाजारपेठेतील अर्थिक उलाढाल मंदावली आहे.  डोंगरावर,माळरानावर,पठारावर गवत उगवले असून निसर्ग हिरवागार झालेला आहे यामुळे जनावरांच्या चा-याचा प्रश्न सुटलेला असुन दुग्ध व्यावसायावरील संकट टळले आहे.

Back to top button