निरा : किराणा व्यापार्‍यांचा बंदला पाठिंबा | पुढारी

निरा : किराणा व्यापार्‍यांचा बंदला पाठिंबा

निरा : पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने अन्नधान्यावर व खाद्यान्नावर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी देशव्यापी बंद पुकारला होता. येथील किराणा व्यापा-यांनी शनिवारी ( दि.16) दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला.
जीएसटी आकारणीमुळे तांदुळ, गहू, गूळ, डाळ, गव्हाचे पीठ, तृणधान्य, पनीर, दही तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. याची झळ व्यापार्‍यासह सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे.

याला विरोध करण्यासाठी शनिवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला. राज्यातील व्यापार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दी पूना मर्चंट चेंबरने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून निरा (ता. पुरंदर) येथील किराणा व्यापार्यांनी एक दिवस लाक्षणिक बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला, असे निरा किराणा व्यापारी असो. अध्यक्ष संतोष गांधी यांनी सांगितले. दरम्यान, बंदला निरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

Back to top button