पुणे : ‘जांभूळवाडी’ला जलपर्णीचा विळखा; सांडव्यात अडकल्याने परिसरात दुर्गंधी | पुढारी

पुणे : ‘जांभूळवाडी’ला जलपर्णीचा विळखा; सांडव्यात अडकल्याने परिसरात दुर्गंधी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आगीमुळे जळालेले उच्चदाब फीडर पिलर बदलताना संततधार पावसाचे अडथळ्यांसह अडचणींवर मात करीत औंधमधील सुमारे 550 ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी रात्री उशिरा सुरळीत करण्यात आला. औंध येथील मेडिपॉईंट रुग्णालयाजवळ महावितरणच्या उच्चदाब फीडर पिलरजवळ शुक्रवारी पहाटे 4 वाजता आग लागली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला; तसेच फीडर पिलरदेखील जळून खाक झाला. महावितरणकडून सकाळी फीडर पिलर बदलण्याचे काम सुरू करण्यात आले.मात्र पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कामांमध्ये व्यत्यय येत गेले. तरीही 6 वाजताच्या सुमारास ही सर्व कामे पूर्णत्वास गेली.

त्यानंतर पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये निर्माण झालेली आर्द्रता ब्लोअरने काढण्याचे काम सुरू करताच त्याठिकाणीच असलेल्या ‘एमएनजीएल’च्या भूमिगत पाईपलाईनमधून गॅस लिकेज होत असल्याचे आढळून आले. याबाबत तत्काळ ‘एमएनजीएल’ला कळविण्यात आले. या कंपनीच्या पथकाकडून गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम रात्री 11 वाजता पूर्ण झाले. त्यानंतर महावितरणकडून उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करून रात्री 11.45 च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मुख्य अभियंता . सचिन तालेवार व अधीक्षक अभियंता सतीश राजदीप यांनी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीची पाहणी केली व तांत्रिक मार्गदर्शन केले.

Back to top button