दागिने बनविणार्‍याची पैसे न देता फसवणूक | पुढारी

दागिने बनविणार्‍याची पैसे न देता फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दागिने बनवून दिल्यानंतरही त्याचा मोबदला न देता फसवणूक करणार्‍या एकावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद रमेश कुलकर्णी (32, रा. जॉयनिस्ट, सोसायटी, लोणी काळभोर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हफिजुल इस्लाम शेख (46, रा. आगरवाल कॉलनी, भवानी पेठ, सिल्व्हर लिफ अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे सोन्याचे दागिने बनविण्याचे दुकान आहे.

कुलकर्णी हा शेख यांच्याकडे वेळोवेळी दागिने बनविण्याची ऑर्डर देत होता. त्याच्या ऑर्डरप्रमाणे शेख यांनी दागिनेही बनवून दिले. परंतु, त्या बदल्यात शेख यांना 935 ग्रॅम सोने किंवा पैसे मिळणे गरजेचे असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

Back to top button