पिंपरी : हिंजवडी आयटीपार्क येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी- माण रस्त्यावर रस्त्यालगत कचर्याच्या ढिगार्याशेजारी एक कुजलेला मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृताचे शीर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंध येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.