पुणे शहरात शुक्रवारी अकरा ठिकाणी झाडपडीच्या घटना | पुढारी

पुणे शहरात शुक्रवारी अकरा ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पावसाची संततधार सुरू असल्याने शहरात शुक्रवारी (दि. 15) अकरा ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.
शहरातील कोंढवा खुर्द येथील ग्राफिकॉन सोसायटी, सदाशिव पेठ येथील ज्ञानप्रबोधिनी, विमाननगर येथील कैलास चौक, औंध येथील सिंध सोसायटी, पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटल, पद्मावती येथील स्वप्नसाकार सोसायटी, एरंडवणा येथील कमला नेहरू पार्क, महर्षीनगर येथील कटारिया हायस्कूल, शिवाजीनगर येथील म्हसोबा गेट, कात्रज येथील संतोष नगर व विधी महाविद्यालय रस्त्यावरील मनपा कोठी परिसरात या घटना घडल्याच्या नोंदी अग्निशामक विभागाकडे करण्यात आले. या घटनानंतर परिसरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. अखेर, अग्निशामक दलातील जवानांनी पडलेले झाड रत्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.

Back to top button